भजनी मालिका
← भजनांकडे परत

बळीवंत कर्म । करी आपुला तो धर्म

balivant karma | kari apula to dharma

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बळीवंत कर्म । करी आपुला तो धर्म ॥१॥ पुढें घालुनियां सत्ता । न्यावें पतना पतिता ॥ध्रु.॥ आचरणें खोटीं । केलीं सलताती पोटीं ॥२॥ तुका म्हणे देवा । नाहीं भजन केली सेवा ॥३॥