भजनी मालिका
← भजनांकडे परत

बळीवंत आम्ही समर्थाचे दास । घातली या कास कळिकाळासी

balivant amhi samarthache das | ghatali ya kas kalikalasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बळीवंत आम्ही समर्थाचे दास । घातली या कास कळिकाळासी ॥१॥ तेथें मानसाचा कोण आला पाड । उलंघोनि जड गेलों आधीं ॥ध्रु.॥ संसाराचे बळी साधिलें निधान । मारिले दुर्जन षडवर्ग ॥२॥ तुका म्हणे एक उरला धरिता ठाव । येर केले वाव तृणवत ॥३॥