भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाळाचें जीवन । माता जाणें भूक तहान

balachen jivan | mata janen bhuk tahan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बाळाचें जीवन । माता जाणें भूक तहान ॥१॥ काय करूं विनवणी । असो मस्तक चरणीं ॥ध्रु.॥ ठेविलिये ठायीं । चित्त ठेवुनि असें पायीं ॥२॥ करितों हे सेवा । चिंतन सर्वां ठायीं देवा॥३॥ न्यून तें चि पुरें । घ्यावें करोनि दातारें ॥४॥ तुका म्हणे बुद्धी । अल्प असे अपराधी ॥५॥