भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसोनियां खाऊं जोडी । ओढाओढी चुकवूनि

baisoniyan khaun jodi | odhaodhi chukavuni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बैसोनियां खाऊं जोडी । ओढाओढी चुकवूनि ॥१॥ ऐसें केलें नारायणें । बरवें जिणें सुखाचें ॥ध्रु.॥ घरीच्या घरीं भांडवल । न लगे बोल वेचावे ॥२॥ तुका म्हणे आटाआटी । चुकली दाटी सकळ ॥३॥