भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसोनि निवांत शुद्ध करीं चित्त । तया सुखा अंतपार नाहीं

baisoni nivant shuddha karin chitta | taya sukha antapar nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बैसोनि निवांत शुद्ध करीं चित्त । तया सुखा अंतपार नाहीं ॥१॥ येऊनि अंतरीं राहील गोपाळ । सायासाचें फळ बैसलिया ॥ध्रु.॥ राम कृष्ण हरी मुकुंद मुरारि । मंत्र हा उच्चारीं वेळोवेळां ॥२॥ तुका म्हणे ऐसें देईन मी दिव्य । जरी होईल भाव एकविध ॥३॥