भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुतांचे संगती । बहु पावलों फजिती

bahutanche sangati | bahu pavalon phajiti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहुतांचे संगती । बहु पावलों फजिती ॥१॥ बरें केलें नंदबाळें । मागिलांचें तोंड काळें ॥ध्रु.॥ माझा करितील तंटा । लपती आलिया बोभाटा ॥२॥ तुका म्हणी काई । किती म्हणों बाप आई ॥३॥