भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुतां रीती काकुलती । आलों चित्तीं न धरा च

bahutan riti kakulati | alon chittin na dhara cha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहुतां रीती काकुलती । आलों चित्तीं न धरा च ॥१॥ आतां काशासाठी देवा । मिथ्या हेवा वाढवूं ॥ध्रु.॥ तुम्हां आम्हां जाली तुटी । आतां भेटी चिंतनें ॥२॥ तुका म्हणे लाजिरवाणें । अधीर जिणें इच्छेचें ॥३॥