भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुतां दिसांची आजि जाली भेटी । जाली होती तुटी काळगती

bahutan disanchi aji jali bheti | jali hoti tuti kalagati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहुतां दिसांची आजि जाली भेटी । जाली होती तुटी काळगती ॥१॥ येथें सावकासें घेईन ते धणी । गेली अडचणी उगवोनि ॥ध्रु.॥ बहु दुःख दिलें होतें घरीं कामें । वाढला हा श्रमेंश्रम होता ॥२॥ बहु दिस होता पाहिला मारग । क्लेशाचा त्या त्याग आजि झाला ॥३॥ बहु होती केली सोंगसंपादणी । लौकिकापासूनि निर्गमलें ॥४॥ तुका म्हणे येथें झालें अवसान । परमानंदीं मन विसावलें ॥५॥