भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु फिरलों ठायाठाव । कोठें भाव पुरे चि ना

bahu phiralon thayathav | kothen bhav pure chi na

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहु फिरलों ठायाठाव । कोठें भाव पुरे चि ना ॥१॥ समाधान तों पावलों । उरलों बोलों यावरी ॥ध्रु.॥ घे गा देवा आशीर्वाद । आमुच्या नांद भाग्यानें ॥२॥ तुका म्हणे जेवूं आधी । खवखव मधीं सारावी ॥३॥