भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु कृपावंते माझीं मायबापें । मी माझ्या संकल्पें अंतरलों

bahu krupavante majhin mayabapen | mi majhya sankalpen antaralon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहु कृपावंते माझीं मायबापें । मी माझ्या संकल्पें अंतरलों ॥१॥ संचितानें नाहीं चुकों दिली वाट । लाविलें अदट मजसवें ॥ध्रु.॥ आतां मी रुसतों न कळतां वर्म । परी ठावे धर्म सर्व देवा ॥२॥ तुका म्हणे उभा राहिला न बैसे । आमुचीया आसे उद्वेग त्या ॥३॥