भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु कनवाळु होसी गा देवराया । म्हणोनि सखया शरण आलों

bahu kanavalu hosi ga devaraya | mhanoni sakhaya sharan alon

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
बहु कनवाळु होसी गा देवराया । म्हणोनि सखया शरण आलों ॥१॥ निवारीं या तापापासोनी सोडवीं । करूणा भाकावी किती तुम्हां ॥२॥ माझीयाचि काजा विलंब दातार । कां न करीं त्वरा देवराया ॥३॥ चोखा म्हणे बहु पडिलों काचणी । सोडवीं चक्रपाणी वेगीं आतां ॥४॥