भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु दिस नाहीं माहेरिंची भेटी । जाली होती तुटी व्यवसायें

bahu dis nahin maherinchi bheti | jali hoti tuti vyavasayen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहु दिस नाहीं माहेरिंची भेटी । जाली होती तुटी व्यवसायें ॥१॥ आपुल्याला होतों गुंतलों व्यासंगें । नाहीं त्या प्रसंगें आठवलें ॥ध्रु.॥ तोडिले तुटतें जडती जडलें । आहे तें आपुलें आपणापें ॥२॥ बहु निरोपाचें पावलें उत्तर । जवळी च पर एक तें ही ॥३॥ काय जाणों मोह होईल सांडिला । बहु दिस तुटला तुका म्हणे ॥४॥