भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु देवा बरें जालें । नसतें गेलें सोंवळें

bahu deva baren jalen | nasaten gelen sonvalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहु देवा बरें जालें । नसतें गेलें सोंवळें ॥१॥ धोवटाशीं पडिली गांठी । जगजेठीप्रसादें ॥ध्रु.॥ गादल्याचा जाला झाडा । गेली पीडा विकल्प ॥२॥ तुका म्हणे वरावरी । निर्मळ करी निर्मळा ॥३॥