भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाहिर पडिलों आपुल्या कर्तव्यें । संसारासि जीवें वेटाळिलों

bahir padilon apulya kartavyen | sansarasi jiven vetalilon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बाहिर पडिलों आपुल्या कर्तव्यें । संसारासि जीवें वेटाळिलों ॥१॥ एकामध्यें एक नाहीं मिळों येत । ताक नवनीत निवडीलें ॥ध्रु.॥ जालीं दोनी नामें एका चि मथनीं । दुसरिया गुणीं वेगळालीं ॥२॥ तुका म्हणे दाखविली मुक्ताफळीं । शिंपले चि स्वस्थळीं खुंटलिया ॥३॥