भजनी मालिका
← भजनांकडे परत

अव्यक्त मसुराकार पूर्वार्ध संचलें

avyakta masurakar purvardha sanchalen

अव्यक्त मसुराकार पूर्वार्ध संचलें । लक्षा सरीसें झालें लक्षासी पैं ॥१॥ अव्यक्त रेखणें देखण्या आलें व्यक्त । पहातां व्यक्तअव्यक्त दोनी नाहीं ॥२॥ जागृतीच्या ठायी निजतो सहस्त्रदळीं बिंदुच्या समेळीं उच्चार होतो ॥३॥ ज्ञानदेव शरण निवृत्तीच्या चरणा । समजुनी खुणा तटस्थ झालें ॥४॥