भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवेवीं सावेव सम साम्य बुध्दी

avevin savev sam samya budhdi

अवेवीं सावेव सम साम्य बुध्दी । शांति दया सिध्दि प्रगटल्या ॥१॥ वोळली हे कृपा निवृत्ति दयाळा । सर्व रोम पाल्हाळा प्रेमांकुर ॥२॥ दिवसाचें चांदिणें रात्रीचें उष्ण । सागितला प्रश्न निवृत्तिराजें ॥३॥ सोहंसिध्दमंत्रें प्रोक्षिलासंसार ॥ मरणाचि येरझार कुंठीयेली ॥४॥ चित्तवित्तगोत आपण पैं जाला । देहीं देहभाव गेला माझा ॥५॥ ज्ञानदेवा रसिं स्त्रान दान गंगे । प्रपंचेसी भंगे विषयजात ॥६॥