भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघ्या उपचारा । एक मन चि दातारा

avaghya upachara | ek man chi datara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघ्या उपचारा । एक मन चि दातारा ॥१॥ घ्यावी घ्यावी माझी सेवा । दिन दुर्बळाची देवा ॥ध्रु.॥ अवघियाचा ठाव । पायांवरी जीवभाव ॥२॥ चित्ताचें आसन । तुका करितो कीर्तन ॥३॥