भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघ्या साधनांचे सार । रामकृष्ण हा उच्चार

avaghya sadhananche sar | ramakrushna ha uchchar

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
अवघ्या साधनांचे सार । रामकृष्ण हा उच्चार ॥१॥ येणें घडे सकळ नेम । वाचें नाम जपतांचि ॥२॥ भाग्यें होय संत भेटी । सांगू गोष्ट सुखाच्या ॥३॥ चोखा म्हणे मज आनंद झाला । जीवलग भेटला मायबाप ॥४॥