भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघियांच्या आलों मुळें । एका वेळे न्यावया

avaghiyanchya alon mulen | eka vele nyavaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघियांच्या आलों मुळें । एका वेळे न्यावया ॥१॥ सिद्ध व्हावें सिद्ध व्हावें । आधीं ठावें करितों ॥ध्रु.॥ जोंवरी ते घटिका दुरी । आहे उरी तो काळ ॥२॥ मंगळाचे वेळे उभे । असों शोभे सावध ॥३॥ अवघियांचा योग घडे । तरी जोडे श्लाघ्यता ॥४॥ तुका म्हणे पाहें वाट । बहु आट करूनि ॥५॥