भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघीं भूतें साम्या आलीं । देखिलीं म्यां कैं होतीं

avaghin bhuten samya alin | dekhilin myan kain hotin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघीं भूतें साम्या आलीं । देखिलीं म्यां कैं होतीं ॥१॥ विश्वास तो खरा मग । पांडुरंगकृपेचा ॥ध्रु.॥ माझी कोणी न धरो शंका । हो कां लोकां निर्द्वंन्द्व ॥२॥ तुका म्हणे जें जें भेटे । तें तें वाटे मी ऐसें ॥३॥