भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघें ब्रम्हरूप रिता नाहीं ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे

avaghen bramharup rita nahin thav | pratima to dev kaisa navhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघें ब्रम्हरूप रिता नाहीं ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे ॥१॥ नाहीं भाव तया सांगावें तें किती । आपुल्याला मतीं पाखांडिया ॥ध्रु.॥ जया भावें संत बोलिले वचन । नाहीं अनुमोदन शाब्दिकांसि ॥२॥ तुका म्हणे संतीं भाव केला बळी । न कळतां खळीं दूषिला देव ॥३॥