भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघा तो शकून । हृदयी देवाचे चिंतन

avagha to shakun | hrudayi devache chintan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघा तो शकून । हृदयी देवाचे चिंतन ॥१॥ येथे नसता वियोग । लाभ उणें काय मग ॥ध्रु.॥ छंद हरी नामाचा । शुचिर्भूत सदा वाचा ॥२॥ तुका म्हणे हरीच्या दासा । शुभ सकाळ अवघ्या दिशा ॥३॥