भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघा प्रेमाचा पुतळा । विठ्ठल पाहा उघडा डोळा

avagha premacha putala | viththal paha ughada dola

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
अवघा प्रेमाचा पुतळा । विठ्ठल पाहा उघडा डोळा ॥१॥ जन्ममरणाची येरझारी । तुटे भवभय निर्धारी ॥२॥ ऐसा प्रताप आगळा । गाये नाचे चोखामेळा ॥३॥