भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघा भार वाटे देवा । संतसेवा न करीता

avagha bhar vate deva | santaseva na karita

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघा भार वाटे देवा । संतसेवा न करीता ॥१॥ कसोटी हे असे हातीं । सत्य भूतीं भगवंत ॥ध्रु.॥ चुकलोंसा दिसें पंथ । गेले संत तो ऐसा ॥२॥ तुका म्हणे सोंग वांयां । कारण या अनुभवें ॥३॥