भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडीचें दान देतो नारायण । बाहे उभारोनि राहिलासे

avadichen dan deto narayan | bahe ubharoni rahilase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आवडीचें दान देतो नारायण । बाहे उभारोनि राहिलासे॥१॥ जें जया रुचे तें करी समोर । सर्वज्ञ उदार मायबाप ॥ध्रु.॥ ठायीं पडिलिया तें चि लागे खावें । ठायींचे चि घ्यावें विचारूनि ॥२॥ बीज पेरूनियां तें चि घ्यावें फळ । डोरलीस केळ कैंचें लागे ॥३॥ तुका म्हणे देवा कांहीं बोल नाहीं । तुझा तूं चि पाहीं शत्रु सखा ॥४॥