भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडीचे भेटी निवे । चित्त पावे विश्रांती

avadiche bheti nive | chitta pave vishranti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आवडीचे भेटी निवे । चित्त पावे विश्रांती ॥१॥ बरवियाचा छंद मना । नारायणा अवीट ॥ध्रु.॥ तूळणे कांहीं साम्या पुरे । हें तों नुरे ये रुचि ॥२॥ तुका म्हणे बरवें जालें । फावलें हें कळे त्या ॥३॥