भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडी येते गुणें । कळों चिन्हें उमटती

avadi yete gunen | kalon chinhen umatati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आवडी येते गुणें । कळों चिन्हें उमटती ॥१॥ पोटीचें ओठीं उभें राहे । चित्त साहे मनासी ॥ध्रु.॥ डाहोळे याची भूक गर्भा । ताटीं प्रभा प्रतिबिंबे ॥२॥ तुका म्हणे मागून घ्यावें । मना खावें वाटे तें ॥३॥