भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडी न पुरे सेवितां न सरे । पडियेली धुरेसवें गांठी

avadi na pure sevitan na sare | padiyeli dhuresaven ganthi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आवडी न पुरे सेवितां न सरे । पडियेली धुरेसवें गांठी ॥१॥ न पुरे हा जन्म हें सुख सांठितां । पुढती ही आतां हें चि मागों ॥ध्रु.॥ मारगाची चिंता पालखी बैसतां । नाहीं उसंतितां कोसपेणी ॥२॥ तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । जाणे ते लागली भूक तान ॥३॥