भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडी कां ठेवूं । बैसोनियां संगें जेवूं

avadi kan thevun | baisoniyan sangen jevun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आवडी कां ठेवूं । बैसोनियां संगें जेवूं ॥१॥ मागें नको ठेवूं उरी । माझी आण तुजवरी ॥ध्रु.॥ देखिले प्रकार । त्याचे पाहेन साचार ॥२॥ तुका म्हणे बाळीं । केली चाहाडी सकळीं ॥३॥