भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडी धरोनी आलेती आकारा । केला हा पसारा याजसाठी

avadi dharoni aleti akara | kela ha pasara yajasathi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आवडी धरोनी आलेती आकारा । केला हा पसारा याजसाठी ॥१॥ तें मी तुझें नाम गाईंन आवडी । क्षण एक घडी विसंबेना ॥ध्रु.॥ वर्म धरावें हा मुख्यधर्मसार । अवघे प्रकार तयापासीं ॥२॥ वेगळ्या विचारें वेगळाले भाव । धरायासी ठाव बहु नाहीं ॥३॥ तुका म्हणे घालूं इच्छेचिये पोटीं । कवळुनी धाकुटी मूर्ती जीवें ॥४॥