भजनी मालिका
← भजनांकडे परत

आत्मिस्थति मज नको हा विचार । देई निरंतर चरणसेवा

atmisthati maj nako ha vichar | dei nirantar charanaseva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आत्मिस्थति मज नको हा विचार । देई निरंतर चरणसेवा ॥१॥ जन्मोजन्मीं तुझा दास पुरुषोत्तमा । हे चि गोडी आम्हां देई जीवा ॥ध्रु.॥ काय सायुज्यता मुक्तीची हे चाड । देव भक्त कोड तेथें नाहीं ॥२॥ काय तें निर्गुण पाहों कैशा परी । वर्णु तुझी हरी कीर्ती कैसी ॥३॥ गोड चरणसेवा देवभक्तपणें । मज देवा झणें दुराविसी ॥४॥ जाणिवेपासूनि सोडवीं सत्वर । देई चरणसेवा निरंतर ॥५॥ तुका म्हणे गोडा गोड न लगे प्रीति । सेवेविण चित्ती सार नाही ॥६॥