भजनी मालिका
← भजनांकडे परत

आत्मरूपीं नाही पाठीं आणि पोट

atmarupin nahi pathin ani pot

आत्मरूपीं नाही पाठीं आणि पोट । एकचि निघोट जाण रया ॥१॥ बाहीर भीतरीं एकचि तें एक । नसे आन देख भेद रया ॥२॥ ठेंगणे नावाड हळू ना ते जड । स्वयेंची अखंड पूर्ण रया ॥३॥ जाणणे नेणणे दोन्ही तेथें नाहीं । आहे जैसे पाहीं तेंचि रया ॥४॥ सदोदीत शुद्ध म्हणे ज्ञानेश्वर । नाहींच विकार कीर रया ॥५॥