भजनी मालिका
← भजनांकडे परत

आत्माराम देखे सहस्त्रदळावरी

atmaram dekhe sahastradalavari

आत्माराम देखे सहस्त्रदळावरी । उन्मनी हे पाहीं आरुते तेहीं ॥१॥ चक्षुचे अंतरी चक्षु देखे पूर्ण । हेचि कीरे खुण तुझें ठायीं ॥२॥ मी ब्रह्म सोई ज्ञानपद तें साजिरें । ते ठायीं निर्धारें तुझा तूंचि ॥३॥ बाप रखुमादेवीवरा तुझा तूं आपण । सर्व हें चैतन्य तुझे ठायीं ॥४॥