भजनी मालिका
← भजनांकडे परत

आठवीं तंव तूंचि जवळिके

athavin tanv tunchi javalike

आठवीं तंव तूंचि जवळिके नाठविसि तरी निजमुखें । आठव न विसरु पाहे तंव सगुणचि ह्रदयीं एक रया ॥१॥ तुझ्या नामाचा आठऊ रुपाचा आठऊ ध्यानाचा आठऊ असो मना ॥२॥ विसरु पडे संसाराचा आठव होता तुझ्या रुपाचा । येथें नाम रुप ठसा ह्रदयीं राहो ॥ जिवाचिया जिवलगा माझिया श्रीरंगा । गोडि घेऊनिया द्वैत पाहे रया ॥३॥ बापरखुमादेविवरा विठ्ठला सगुणी सुमनीं गुंफिले । प्रीति आवडे तों कोंदाटलें सुमनीं हें विरालें ॥४॥ जाली नामरुपीं ऐक्यभेटीं । नामरुप सार जाणोनि जीवन संसारा जाली तुटी रया ॥५॥