भजनी मालिका
← भजनांकडे परत

आठवे देव तो करावा उपाव । येर तजीं वाव खटपटा

athave dev to karava upav | yer tajin vav khatapata

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आठवे देव तो करावा उपाव । येर तजीं वाव खटपटा ॥१॥ होई बा जागा होई बा जागा । वाउगा कां गा सिणसील ॥ध्रु.॥ जाणिवेच्या भारें भवाचिये डोहीं । बुडसी तों कांहीं निघसि ना ॥२॥ तुका म्हणे देवा पावसील भावें । जाणतां तें ठावें कांहीं नव्हे ॥३॥