भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां येथें लाजे नाहीं तुझें काम । जाय मज राम आठवूं दे

atan yethen laje nahin tujhen kam | jay maj ram athavun de

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां येथें लाजे नाहीं तुझें काम । जाय मज राम आठवूं दे ॥१॥ तुझे भिडे माझे बहु जाले घात । केलों या अंकित दुर्जनाचा ॥ध्रु.॥ माझें केलें मज पारिखें माहेर । नष्ट तु साचार चाळविलें ॥२॥ सुखासाठी एक वाहियेलें खांदीं । तेणें बहु मांदी मेळविली ॥३॥ केला चौघाचार नेलों पांचांमधीं । नाहीं दिली शुद्धी धरूं आशा ॥४॥ तुका म्हणे आतां घेईन कांठीवरी । धनी म्यां कैवारी केला देवा ॥५॥