भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां येणें बळें पंढरीनाथ । जवळी राहिला तिष्ठत । पाहातां न कळे जयाचा अंत । तोचि हृदयांत घालूं आतां

atan yenen balen pandharinath | javali rahila tishthat | pahatan na kale jayacha ant | tochi hrudayant ghalun atan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां येणें बळें पंढरीनाथ । जवळी राहिला तिष्ठत । पाहातां न कळे जयाचा अंत । तोचि हृदयांत घालूं आतां ॥१॥ विसरोनि आपुला देहपणभाव । नामें चि भुलविला पंढरीराव । न विचारी याती कुळ नांव । लागावया पाव संतांचे ॥२॥ बरें वर्म आलें आमुचिया हातां । हिंडावें धुंडावें न लगतां । होय अविनाश सहाकारी दाता । चतुर्भुज संता परि धाकें ॥३॥ होय आवडी सान थोर । रूप सुंदर मनोहर । भक्तीप्रिय लोभापर । करी आदर याचकपणें ॥४॥ तें वर्म आलें आमुच्या हाता । म्हणोनि शरण निघालों संतां । तुका म्हणे पंढरीनाथा । न सोडी आतां जीवें भावें ॥५॥