भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां सोडवणें न या नारायणा । तरि मी न वंचे जाणा काळा हातीं

atan sodavanen na ya narayana | tari mi na vanche jana kala hatin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां सोडवणें न या नारायणा । तरि मी न वंचे जाणा काळा हातीं ॥१॥ ऐसें सांगोनिया झालों उतराईं । आणीक तें काईं माझे हातीं ॥ध्रु.॥ केलियाचें माप नये सेवटासी । करितील नासि अंतराय ॥२॥ तुका म्हणे भय वाटतसे जीवा । धांवणिया धांवा लवकरी ॥३॥