भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां पंथ पाहों माहेराची वाट । कामाचा बोभाट पडो सुखे

atan panth pahon maherachi vat | kamacha bobhat pado sukhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां पंथ पाहों माहेराची वाट । कामाचा बोभाट पडो सुखे ॥१॥ काय करूं आतां न गमेसे झाले । बहुत सोसिले बहु दिस ॥ध्रु.॥ घर लागे पाठी चित्ता उभे वारे। आपुले ते झुरे पाहावया ॥२॥ तुका म्हणे जीव गेला तरी जावो । धरिला तो देव भाव शुध्द ॥३॥