भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां पहाशील काय माझा अंत । आलों शरणागत तुज देवा

atan pahashil kay majha ant | alon sharanagat tuj deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां पहाशील काय माझा अंत । आलों शरणागत तुज देवा ॥१॥ करीं अंगीकार राखें पायांपाशीं । झणीं दिसों देसी केविलवाणें ॥ध्रु.॥ नाहीं आइकिली मागें ऐसी मात । जे त्वां शरणागत उपेक्षिले ॥२॥ तुका म्हणे आतां धरीं अभिमान । आहेसी तूं दानशूर दाता ॥३॥