भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां नव्हे गोड करितां संसार । आणीक संचार झाला माजी

atan navhe god karitan sansar | anik sanchar jhala maji

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां नव्हे गोड करितां संसार । आणीक संचार झाला माजी ॥१॥ ब्रम्हरसें गेलें भरूनियां अंग । आधील तो रंग पालटला ॥ध्रु.॥ रसनेचिये रुची कंठीं नारायण । बैसोनियां मन निवविलें ॥२॥ तुका म्हणे आतां बैसलों ठाकणीं । इच्छेची ते धणी पुरईल ॥३॥