भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां माझ्या दुःखा कोण हो सांगाती । रखुमाईचा पति पावे चि ना

atan majhya duhkha kon ho sangati | rakhumaicha pati pave chi na

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां माझ्या दुःखा कोण हो सांगाती । रखुमाईचा पति पावे चि ना ॥१॥ कायविधा त्यानें घातलीसे रेखा । सुटका या दुःखा न होय चि ॥२॥ तुका म्हणे माझी विसरूं नको चिंता । अगा पंढरिनाथा पाव वेगी ॥३॥