भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां कोठें धांवे मन

atan kothen dhanve man

आतां कोठें धांवे मन । तुझे चरण देखिलिया ॥१॥ भाग गेला सीण गेला । अवघा झाला आनंदु ॥ध्रु.॥ प्रेमरसें बैसली मिठी । आवडी लाठी मुखासी ॥२॥ तुका म्हणे आम्हां जोगें । विठ्ठल घोगें खरें माप ॥३॥