भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां कोठवरी । भीड तुमची धरूं हरि

atan kothavari | bhid tumachi dharun hari

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
आतां कोठवरी । भीड तुमची धरूं हरि ॥१॥ दार राखीत बैंसलों । तुम्ही दिसे मोकलिलों ॥२॥ ही नीत नव्हे बरी । तुमची साजे तुम्हा थोरी ॥३॥ चोखा म्हणे काय बोलों । आमुचे आम्ही वायां गेलों ॥४॥