भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां करावा कां सोंस वांयांविण । लटिका चि सीण मनासी हा

atan karava kan sons vanyanvin | latika chi sin manasi ha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां करावा कां सोंस वांयांविण । लटिका चि सीण मनासी हा ॥१॥ असेल तें कळों येईल लौकरी । आतां वारकरी आल्यापाठी ॥ध्रु.॥ बहु विलंबाचें सन्निध पातलें । धीराचें राहिलें फळ पोटीं ॥२॥ चालिलें तें ठाव पावेल सेवटीं । पुरलिया तुटी पाउलांची ॥३॥ तुका ह्मणे आसे लागलासे जीव । ह्मणऊनि कींव भाकीतसें ॥४॥