भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां हें चि सार हें चि सार । मूळबीज रे आइका

atan hen chi sar hen chi sar | mulabij re aika

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां हें चि सार हें चि सार । मूळबीज रे आइका ॥१॥ आवडीनें आवडी उरे । जें ज्या झुरे तें त्यासी ॥ध्रु.॥ प्रेमाचिया सूत्रदोरी । नाहीं उरी उरवी ॥२॥ तुका म्हणे चिंतन बरें । आहे खरें खऱ्यापें ॥३॥