भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां हें चि जेऊं । सवें घेऊं सिदोरी

atan hen chi jeun | saven gheun sidori

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां हें चि जेऊं । सवें घेऊं सिदोरी ॥१॥ हरीनामाचा खिचडा केला । प्रेमें मोहिला साधनें ॥ध्रु.॥ चवीं चवीं घेऊं घास । ब्रम्हरस आवडी ॥२॥ तुका म्हणे गोड लागे । तों तों मागे रसना ॥३॥