भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां गुण दोष काय विचारिसी । मी तों आहे रासी पातकांची

atan gun dosh kay vicharisi | mi ton ahe rasi patakanchi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां गुण दोष काय विचारिसी । मी तों आहे रासी पातकांची ॥१॥ पतितपावनासवें समागम । अपुलाले धर्म चालवीजे॥ध्रु.॥ घनघायें भेटी लोखंडपरिसा । तरी अनारिसा न पालटे ॥२॥ तुका म्हणे माती कोण पुसे फुका । कस्तुरीच्या तुका समागमें ॥३॥