भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां गाऊं तुज ओविया मंगळीं । करूं गदारोळी हरीकथा

atan gaun tuj oviya mangalin | karun gadaroli harikatha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां गाऊं तुज ओविया मंगळीं । करूं गदारोळी हरीकथा ॥१॥ होसि निवारिता आमुचें सकळ । भय तळमळ पापपुण्य ॥ध्रु.॥ भोगिले ते भोग लावूं तुझे अंगीं । अलिप्त या जगीं होउनि राहों ॥२॥ तुका म्हणे आम्ही लाडिकीं लेंकरें । न राहों अंतरे पायांविण ॥३॥