भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां धर्माधर्मी कांहीं उचित । माझें विचारावें हित । तुज मी ठाउका पतित । शरणागत परि जालों

atan dharmadharmi kanhin uchit | majhen vicharaven hit | tuj mi thauka patit | sharanagat pari jalon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां धर्माधर्मी कांहीं उचित । माझें विचारावें हित । तुज मी ठाउका पतित । शरणागत परि जालों ॥१॥ येथें राया रंका एकी सरी । नाहीं भिन्नाभिन्न तुमच्या घरीं । पावलों पाय भलत्या परी । मग बाहेरी न घालावें ॥ध्रु.॥ ऐसें हें चालत आलें मागें । नाहीं मी बोलत वाउगें । आपुलिया पडिल्या प्रसंगें । कीर्ती हे जगे वाणिजेते ॥२॥ घालोनियां माथां बैसलों भार । सांडिला लौकिक वेव्हार । आधीं हे विचारिली थार । अविनाश पर पद ऐसें ॥३॥ येथें एक वर्म पाहिजे धीर । परि म्यां लेखिलें असार । देह हें नाशिवंत जाणार । धरिलें सार नाम तुझें ॥४॥ केली आराणुक सकळां हातीं। धरावें धरिलें तें चित्तीं । तुका म्हणें सांगितलें संतीं । देई अंतीं ठाव मज देवा ॥५॥